महाराष्ट्र

दुधाचे अनुदान लवकरात लवकर द्यावे

Published by
Ahmednagarlive24 Office

Maharashtra News : राज्य शासनाने जाहीर केलेले दुधाचे प्रतिलिटर पाच रुपये अनुदान लवकरात लवकर देऊन दूध उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

बाजारभावा अभावी गेल्या वर्षीपासून आज मितीस तोट्यात गेलेला दूध व्यवसायाला ५ जानेवारी रोजी राज्य शासनाने दुधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केले. प्रथम महिना मुदत असलेली ही वाढ १० मार्चपर्यंत करण्यात आली होती.

त्यात विविध अडचणींना सामोरे जात अनुदान मिळवण्यासाठी अनेक कागद पत्राची, जनावरांची एअर टॅगिग, ऑन लाईन फ्रॉम, अपलोड आदींची जुळवाजुळव करत यात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले होते.

मात्र आता कडक उन्हाळा चालू झाल्याने पशुधनांच्या हिरवा चारा मिळणे कठीण झाला आहे. विक्रीस असलेल्या हिरव्या चाऱ्याच्या किमती गगनाला भिडल्या आहे. किमान अनुदाची रक्कम लवकर मिळाल्यास पशुधनाची चारा घेण्यास हातभार लागेल.

त्यामुळे अनुदानाची रक्कम तात्काळ दूध व्यवसायिकाच्या खाती जमा करावी अशी मागणी होत आहे.

भाववाढ होईपर्यंत अनुदान मिळावे

आतबट्ट्याचा झालेला दुध व्यवसाय सद्य स्थितीत मोठ्या अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. पशुसंवर्धन करणे जिकरीचे झाले आहे. वाढलेले पशुधनांचे खुराक, औषधे, याचा ताळमेळ आजमितीला काहीच शिल्लक राहत नाही. किमान भाव वाढ होईपर्यंत अनुदान मिळावे, अशी मागणी होत आहे.

भर उन्हाळ्यात भाववाढ रखडली कशी?

सध्या कडाक्याचे ऊन पडत असून, दुधापासून तयार होणाऱ्या उपप्रदार्थ यांना बाजारात मागणी असून, त्याचे भावही तेजीत आहेत. मग शेतकऱ्यांच्याच दुधाला भाव कसा नाही? असा संतप्त सवाल दूध उत्पादक करत आहेत.

Ahmednagarlive24 Office