शिवकन्या असे नामकरण धनंजय मुंडे, सुप्रिया सुळेंनी घेतले ‘नकोशी’चे पालकत्व

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

परळी : रेल्वे रुळाजवळ आढळलेल्या ‘नकोशी’ शिवकन्या असे नामकरण करत धनंजय मुंडे व खा. सुप्रिया सुळे यांनी तीचे पालकत्व स्वीकारले. येथील रेल्वेरुळाजवळील काटेरी झुडपात जिवंत स्त्री अर्भक आढळल्याने सोमवारी रात्री एकच खळबळ उडाली होती.

या अर्भकाला जन्म देणाऱ्या मातेचा अवघ्या बारा तासांमध्ये शोध घेण्यात पोलिसांना यश आले. एका कुमारी मातेने तिला जन्म देऊन बदनामीच्या भीतीने फेकल्याचे समोर आले असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले.

शहरातील भीमानगर परिसरातील सिमेंट फॅक्ट्रीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रेल्वे रुळाजवळ एका काटेरी झुडपात रात्री साडेसात वाजेच्या सुमारास निवस्त्र स्त्री अर्भक आढळले होते. बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने नागरिकांनी या अर्भकास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.

त्यानंतर पोलीस व आरोग्य यंत्रणा कामाला लागली होती. जाफर खान अफसर खान (२८ रा. भीमानगर) यांच्याफिर्यादीवरुन अज्ञात मातेविरुध्द संभाजीनगर ठाण्यात कलम ३१७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी रात्रीतून तपासचक्रे फिरवली. शहरातील डझनभर खासगी प्रसूतीगृहांची तपासणी करुन झाडाझडती घेण्यात आली.

अहमदनगर लाईव्ह 24