मंत्री नवाब मालिकांच्या अडचणीत भर…न्यायालयाकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  09 फेब्रुवारी 2022 :- अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्या आरोप – प्रत्यारोपाच्या प्रकरणामध्ये दररोज नवीन काहीतरी घडते आहे. यातच आता याच प्रकरणात मंत्री नवाब मालिकांच्या अडचणीत भर पडल्याचे वृत्त सामोरे आलं आहे.

एनसीबीचे तत्कालीन विभागीय अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात कोणतेही वक्तव्य करणार नाही, अशी न्यायालयात हमी देऊनही वादग्रस्त विधान करणार्‍या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

मलिक यांच्याकडून बदनामी सुरूच असल्याचा दावा करून ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली.यावर कोर्टाने मलिक यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली.

मुंबईतील क्रुझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने मोठी कारवाई केली होती. एनसीबीचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही कारवाई प्रचंड वादग्रस्त ठरली.

दरम्यान, या प्रकरणावरुन एनसीबीला धारेवर धरताना नवाब मलिक यानी संचालक समीर वानखेडे यांच्यावरही अनेक आरोप केले होते. यातील बरेच आरोप व्यक्तीगत पातळीवरचे असले तरी त्याचा संबंध सरकारी नोकरीशी असल्याने त्याची व्याप्ती वाढत होती.

दरम्यान सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मलिक यांनी वानखेडे यांच्या कुटुंबीयांबाबतची वेगवेगळी माहिती मलीक यांनी उघड केली होती. यावरुन वानखेडे कुटुंबीय कोर्टात गेले होते. मलिक यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता.

त्यानंतर कोर्टाने मलिक यांना वानखेडे यांच्या कुटुंबीयांबाबत आक्षेपार्ह विधाने करणार नाही अशी हमी मलिक यांच्याकडून घेतली होती.

मलिक वारंवार असे कृत्य करत असून जातपडताळणी समितीसमोर सुनावणी झाल्यानंतर वानखेडे यांच्याविरोधात ट्विट करून जाणूनबुजून उच्च न्यायालयाचा अवमान करत आहेत.

त्यांचे हे कृत्य न्यायालयाचा अवमान करणारे आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात अवमानाची कारवाई, तसेच याचिकेचा दंड वसूल करावा, अशी मागणी केली आहे.