ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे पडद्यामागे महागुंड !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नगर जिल्ह्यात रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी ऑइल मिळत नाही. शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळत नाही.

अतिवृष्टीमुळे पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी राहुरी महसूल मंडळ वगळता तालुक्‍यातील अन्य सहा मंडळांतील शेतकरी वंचित राहिले.

वीज व अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरावे लागेल. मला गुंड म्हणणारे राज्यमंत्री तनपुरे पडद्यामागे महागुंड आहेत.

बनावट डिझेलप्रकरणी मुख्य सूत्रधाराला पाठीशी घालण्याचे काम केले. त्यांचे मामा जलसंपदामंत्री आहेत. पाच वर्षांत निळवंडे कालव्याचे काम करून दाखवा, पाठ थोपटीन.

”असे आवाहन शिवाजी कर्डीले यांनी तनपुरे यांना दिले आहे. गणेगाव येथे जिल्हा बॅंकेतर्फे शेतकऱ्यांना गायी-म्हशींसाठी खेळते भांडवल कर्जवितरणप्रसंगी कर्डिले बोलत होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24