आदिवासी विकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विभागाच्या विविध योजनांचा घेतला आढावा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला.

विधानभवनात आयोजित आढावा बैठकीत आदिवासी विभागातील महामंडळाच्या खरेदी प्रक्रियाबाबत ,कौशल्य विकास योजनांचा, प्रकल्प कार्यालयामर्फत न्युक्लिअस बजेट अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना आणि आस्थापना यांचा सविस्तर आढावा घेतला.यावेळी आदिवासी विकास विभातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री तनपुरे म्हणाले,आदिवासी विकास महामंडाळामार्फत धान/भरडधान्य खरेदीसाठी आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थाची नियुक्ती केली जाते. ज्या ठिकाणी संस्था खरेदी करण्यासतयार नसल्यास अशा ठिकाणी महामंडळाचे स्वतः चे खरेदी केंद्र उघडले जातात.

आदिवासी संचलनालय नाशिक,आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, प्रकल्प कार्यालय यांच्यामार्फत राबविण्यात येणारे प्रशिक्षण कालावधी संपली असली तरी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.यामध्ये वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रात आवश्यक असलेल्या

मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रम शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24