मंत्री तनपुरेंची ‘ती’ कृती अन घरकुल लाभार्थ्यांना झाला ‘हा’ फायदा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  राहुरी नगरपालिका हद्दीतील प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मंजूर घरकुलांच्या लाभार्थ्यांची आर्थिक अडचण नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दूर केली आहे.

ग्रीनझोनमधील लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी देण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. शुक्रवारी राहुरी येथे घरकुलाच्या पहिल्या टप्प्यातील 233 व दुसऱ्या टप्प्यातील 460 लाभार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारचे 6 कोटी 82 लाख रुपये अनुदान वितरण करण्यात आले.

यावेळी मंत्री तनपुरे म्हणाले, राहुरी पालिकेने जिल्ह्यात सर्वप्रथम योजना राबविण्यास सुरुवात केली. कामही सर्वप्रथम करावे. शहराच्या विकासासाठी वर्षभरात दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

“घरकुलाचे अनुदानात दीड वर्षापासून रखडले होते. म्हाडाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेऊन, राज्य सरकारचे अनुदान वर्ग केले. नगराध्यक्षपदाच्या काळात तीन वर्षात निधीअभावी विकास कामांना ब्रेक लागला होता. आता गती मिळेल.

जोगेश्वरी आखाडा येथे स्मशानभूमीच्या विकासासाठी 33 लाख, जॉगिंग ट्रॅक साठी दीड कोटी निधी मंजूर केला आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार मदत करणार आहे.” असेही मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24