पुणे : चाकणमधील एका कंपनीत पती कामाला गेल्यानंतर कोणाला काही न सांगता सव्वीस वर्षीय विवाहिता मागील दीड महिन्यापासून तिच्या तीन लहान चिमुकल्यांना बरोबर घेऊन निघून गेली आहे.
हे चौघेजण परत घरी न आल्याने अद्याप बेपत्ता असल्याची फिर्याद देण्यात आली आहेत.
रेश्मा काशीनाथ कंबार (वय २६), ऐश्वर्या काशीनाथ कंबार (वय १०), श्रद्धा काशीनाथ कंबार (वय ६) व श्री काशीनाथ कंबार (वय ५, सर्व सध्या रा. नागेश्वर मंदिराजवळ, मोशी, ता. हवेली) अशी बेपत्ता झालेल्या मायलेकरांची नावे आहेत.
रेश्मा कंबार यांचे पती काशीनाथ राणबा कंबार (वय ३१) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. याबाबतची माहिती अशी की, रेश्मा हिचे पती काशीनाथ हे मंगळवारी (दि. ८) सकाळी साडेसातच्या दरम्यान चाकण येथील एका कंपनीत कामाला गेले होते.
त्यानंतर रेश्मा ही तिची मुले ऐश्वर्या, श्रद्धा व श्री यांना बरोबर घेऊन निघून गेली आहे.