अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून वातावरण तापत चालले आहे.
हे पण वाचा :- वाढदिवसाला आणली तलवार आणि नंतर झाले असे काही…
सरपंचाची निवड थेट जनतेतून होत आसल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही लढत भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे आणि श्रीगोंदे-नगरचे आमदार बबनराव पाचपुते या दोन गटांत होत आहे.आमदार अरुण जगताप यांच्या समर्थकांना दोन्ही पॅनेलकडून उमेदवारी डावलण्यात आली आहे.
हे पण वाचा :- या कारणामुळे प्राजक्त तनपुरे झाले मंत्री खुद्द शरद पवारांनीच दिले स्पष्टीकरण !
आमदार अरुण जगताप यांच्या समर्थक सविता राजेंद्र घोडके व अशा भास्कर लोखंडे यांना उमेदवारी डावलल्याने राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगतापांचे वर्चस्व कमी झाले आहे.
हे पण वाचा :- राष्ट्रवादीचा हा नेता होणार अहमदनगरचा पालकमंत्री ?
मांडवगण जिल्हा परिषद गटावर जगताप गटाचे वर्चस्व असले, तरी या निवडणुकीनंतर सरपंचपदावर भाजपची व्यक्ती विराजमान होणार असल्याने जगताप कुटुंबाची पकड कमी होण्याची चिन्हे आहेत.
हे पण वाचा :- आमदार निलेश लंके म्हणाले मंत्रिपदापेक्षा ही गोष्ट माझ्यासाठी महत्वाची !
सरपंचपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सदाफुले विजयी झाल्यास सिद्धेश्वर देशमुख यांचे वर्चस्व प्रस्थापित होईल. चव्हाण विजयी झाल्यास अर्जुनराव बोरुडे यांचे वर्चस्व सिद्ध होईल.
हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : सावेडीत हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या अड्डाच्या पर्दाफाश