अहमदनगर- विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीगोंदा मतदारसंघातून सातव्यांदा आमदार झालेल्या बबनराव पाचपुते यांना तातडीने मुंबईला बोलावले आहे.
त्यामुळे आ. पाचपुते रात्रीच मुंबईकडे रवाना झाले आहेत. संभाव्य मंत्रीमंडळात आ. पाचपुते यांची वर्णी लागण्याची शक्यता त्यामुळे बळावली आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपाचे बबनराव पाचपुते 4 हजार 523 मतांनी विजयी झाले. त्यांना 1 लाख 2 हजार 503 तर घन:श्याम शेलार यांना 97 हजार 980 मते मिळाली.
निवडणुकीचा निकाल घोषित झाल्यानंतर सायंकाळी 7.30 च्या सुमारास पाचपुते यांना मुख्यमंत्र्यांचा फोन आला व त्यांनी पाचपुते यांना तातडीने मुंबईला येण्याचा निरोप दिला. त्यानुसार आ. बबनराव पाचपुते व त्यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते हे तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत.
आ. पाचपुते यांना विधीमंडळ कामकाजाचा मोठा अनुभव आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून ते सातव्यांदा वेगवेगळ्या चिन्हांवर निवडून गेलेले आहेत. त्यांनी अनेक मंत्रीपदेही भूषविली आहेत.
त्यामुळे संभाव्य मंत्रीमंडळात त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना तातडीने मुंबईला बोलविल्याने याबाबतची शक्यता बळावली आहे.
त्यामुळे संभाव्य मंत्रीमंडळात त्यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना तातडीने मुंबईला बोलविल्याने याबाबतची शक्यता बळावली आहे.