शेतकऱ्यांसाठी आमदार बबनराव पाचपुते बँकेच्या दारात !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 :  पावसाळा सुरु झाला तरी अजूनही शेतक-यांना बँकेने कर्ज दिलेले नाही, शेती पिक कर्ज तात्काळ अदा करा या मागणीसाठी आमदार बबनराव पाचपुते यांनी भाजपा पदाधिका-यांच्या उपस्थितीत काष्टी येथील युनियन बँक ऑफ इंडिया व महाराष्ट्र बँके समोर आंदोलन केले.

कोरोना संकटाच्या काळात देश थांबला असला तरी शेतीची कामे मात्र सुरूच होती.खरीप हंगाम सुरु झाला आहे.हरभरा खराब झाला, तूर अजून विकली जात नाही,

शेतक-यांना नवीन बियाणे, खते खरेदीसाठी पैसे नाहीत, पैसे नसल्याने त्यांनी कर्जासाठी बँकांकडे अर्ज केले आहेत मात्र अजूनही बँकांनी शेतक-यांना कर्ज दिलेले नाही.

बँकांनी तात्काळ कर्ज मंजूर करून कर्जाचे पैसे शेतक-यांच्या खात्यावर वर्ग करावेत अशी मागणी आमदार पाचपुते यांनी करुन बँकांनी या आंदोलनाची योग्य ती दखल न घेतल्यास पुन्हा तीव्र प्रकारचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा ही यावेळी आंदोलकांच्या वतीने देण्यात आला.

तसेच यावेळी मा.पंतप्रधानांचे संदेश पत्र आमदार पाचपुते व भाजपा पदाधिका-यांच्या हस्ते नागरिकांना देण्यात आले.सदरचे आंदोलन कोरोना प्रादुर्भावामुळे योग्य ती दखल घेऊन करण्यात आले.

यावेळी आमदार पाचपुते यांचे सोबत भाजपचे जेष्ठ नेते भगवानराव पाचपुते, तालुक्काध्यक्ष संदीप नागवडे, युवा नेते विक्रमसिंह पाचपुते, गणपतराव काकडे, अनुजा गायकवाड, भास्कर तात्या जगताप, दिपक शिंदे, राजेंद्र उकांडे, शिवाजीराव जाधव, ओहळ सर, दिपक हिरनावळे,उमेश बोरुडे, महेश क्षीरसागर इत्यादी पदाधिकारी उपस्थितीत होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24