अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :- श्रीगोंद्याचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांना कोरोनाची लागण झाली आहे.
विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आ.पाचपुते यांनी करोना चाचणी केली होती.त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
यानंतर आ.पाचपुते हे काष्टी येथील स्वताच्या निवासस्थानीच क्वारंटाईन झाले आहेत.याबाबत त्यांनी स्वत: सोशल मीडियावर पोस्ट लिहून माहिती दिली आहे.
पाचपुते यांनी म्हटलं आहे की,
अखेर ‘कोरोना’ने मला गाठलेच ! “विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने मी माझी कोरोना चाचणी केली असता मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.
मला कोणतीही लक्षणे नसून तब्बेत अगदी ठणठणीत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली चाचणी करुन घ्यावी…
आणि शक्यतो डॉक्टरांचा सल्ला लक्षात घ्यावा. आपल्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने मी लवकरच आपल्या सेवेत हजर होईल. धन्यवाद !