मुंबई :- प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बच्चू कडू हे ओला दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी मोर्चा काढून जोरदार आंदोलन करणार होते.
यावेळी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली निघालेला मोर्चा पोलिसांनी नरिमन पॉईंट येथे अडवला. तसेच बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
याआधी पोलिसांनी बच्चू कडू यांनी मोर्चा आयोजित करण्यासाठीची परवानगी नाकारली होती. यानंतरही बच्चू कडू यांनी आपण मोर्चा काढणारच असल्याचं सांगितलं होतं.
यामुळे पोलिसांनी नरिमन पॉईंट येथेच बच्चू कडू यांचा समर्थकांसबोतचा मोर्चा अडवला आणि ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
राजभवनाकडे जाणारा हा मोर्चा पोलिसांनी नरिमन पॉईंट येथे अडवला. तसेच बच्चू कडू आणि त्यांच्यासह आंदोलनात सहभागी असलेल्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर हे आंदोलन अधिकच चिघळले.
दरम्यान सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणार नाही का ? असा सवाल बच्चू कडू यांनी विचारला आहे.