अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता लॉकडाऊन, जनता कर्फ्यूची मागणी होऊ लागली आहे.
नगर शहरात देखील पुन्हा लॉकडाऊन करावे कि नाही याबाबत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी आपले मत व्यक्त केलं आहे.
जिल्ह्यात कोरोनाचे जाळे मोठ्याप्रमाणावर पसरले आहे. यामुळेच नगर शहरात जनता कर्फ्यूची मागणी वारंवार होत आहे. व्यापारी, विविध संघटना,
सामाजिक संस्था यांच्यासह नगरकर जनतेची मागणी असेल तर नगरमध्ये जनता कर्फ्यूसाठी मी तयार असल्याचे प्रतिपादन शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.
यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले कि, कोरोना संकटाच्या काळात नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा.
तसेच अनेक नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क साधला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करावे जेणेकरून धोका टाळता येणे शक्य होईल. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रिफ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी आढावा बैठक घेतात.
या आढावा बैठकीत नगर शहरासह संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला जातो. आढावा बैठकीमध्ये सर्व परिस्थिती समोर येते. त्याुमुळे व्यापारी असोसिएशन, सामाजिक संस्था, संघटना, नगरकरांची मागणी असेल तर मी तयार आहे.
नगरमध्ये पहिला रुग्ण एप्रिलमध्ये आढळून आला. सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरानाबाधितांची संख्या 28 हजारांच्या पुढे गेली आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved