अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- गेल्या काही वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सौर ऊर्जा, इथेनॉल यासारख्या क्षेत्रांत केलेलं काम हे निश्चितच उल्लेखनीय आहे. याबाबत केंद्र सरकारचं कौतुक करायलाच हवं.
देशातील वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठीही असंच काम होईल, असा विश्वास आहे. तसंच कोरोना हे दुसर्या महायुद्धानंतरचं जगापुढचं सर्वात मोठं आव्हान असून याविरोधात निर्णायक कृती करण्याचं आवाहन मोदीजींनी जी 20 परिषदेत जागतिक नेत्यांना केल्याने आनंद वाटला.
त्यांनी या संकटाची जाणीव भाजपच्या राज्यातील नेत्यांनाही करुन दिली तर ते या संकटाचा राजकीय खेळ थांबवतील, अशी प्रतिक्रिया आ.रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
आ.पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंड भरून कौतुक करताना राज्यातील भाजप नेत्यांनाही चांगलेच सुनावले. कोरोनावरुन भाजपच्या लोकांनी राजकारण करणे थांबविण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. आ.पवार यांनी व्टिट करून पंतप्रधानांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved