अहमदनगर Live24 टीम ,26 जून 2020 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांती सुर्य महात्मा जोतिबा फुले, भारतरत्न डाॅ. ए पी जे अब्दूल कलाम व इतर महापुरूषांचा आमदार रोहीत पवार यांनी अवमान केला असून या प्रकरणी त्यांचा आम्ही निषेध करत असून या विरोधात विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी निषेध करावा असे, आवाहन ही नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी केले आहे.
राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आमदार रोहीत पवार हे सुडाचे राजकारण करत आहेत. रोहित पवार यांनी महापुरुषांच्या स्मारकाचा व महापुरुषांच्या चौक सुशोभीकरणचा निधी हा गटाराकडे निधी वळवला आहे.
या पत्रामध्ये राऊत यांनी पुढे म्हटले आहे कि, २७ मार्च २०१८ साली तत्कालीन पालकमंत्री प्रा राम शिंदे व मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस व अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी नगरपरीषदांना वैशिष्ठपुर्ण कामासाठी विशेष अनुदान योजने अंतर्गत १० कोटी रूपये निधी कर्जत नगर पंचायतीस दिला होता
यामध्ये व्यापारी संकूल उभारणी ७ कोटी व चैाक सुशोभिकरण २ कोटी, रस्ते विकास १ कोटी यांचा समावेश होता. कर्जत नगर पंचायतीने चैाक सुशोभिकरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज , भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, डाॅ ए पी जे अब्दूल कलाम महासती अक्काबाई तसेच इतर महापुरूषांच्या नावाने प्रस्ताव तयार करून पाठवले होते
याचे डिझाईन तसेच पुतळे व इतर साहित्य यांची नोंदणी केली होती आणि यास जिल्हाधिकारी यांनी २५ मार्च २०१८ या दिवशी मंजुरी आदेश दिला होता.
मात्र कर्जत शहरातील मुख्य रस्त्याचे रूंदीकरण काम होत आहे याआगोदर कामे केल्यास अडचण होणार होती व हे कामे रस्ता रूंदीकरण करताना अडथळा ठरले असते म्हणून रस्ता रूंदीकरण पुर्ण झाल्यावर हे चौक सुशोभिकरण करण्याचा ठरले यामध्ये मुख्य रस्ता वगळता इतर रस्त्यावरील कामे पुर्ण करण्यात आली आहेत
पंरतु यादरम्यान विधानसभेची निवडणूक झाली या मतदार संघामधून आमदार रोहीत पवार हे निवडून आले मात्र त्यांच्या विरोधात आम्ही प्रा. राम शिंदे यांचे काम केल्याचा राग मनात ठेवून सुडबूध्दीने त्यांनी २७ मार्च २०१८ रोजी मिळालेला सर्व निधी अनाधिकारने व सत्तेचा गैरवापर करीत रद्द केला आणि हा सर्व निधी त्यांनी गटारी आणि रस्ते दुरूस्ती साठी वापरण्यास मंजुरी देखील २० जुन २०२० रोजी आणली आहे
मात्र हे करताना त्यांनी या राज्यातील, तालुक्यातील व शहरातील तमाम नागरीकांचे दैवत असणारे छत्रपती शिवाजीमहाराज, डाॅ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, डाॅ ए पी जे अब्दूल कलाम व इतर महापुरूषांचा आमदार रोहीत पवार यांनी गटार आणि रस्ते यांचेशी तुलना करीत अवमान केला आहे याचा मी निषेध करतो. या प्रकरणी त्यांनी जनतेची माफी मागावी व महापुरूषांच्या सुशोभिकरणाचा निधी परत वर्ग करावा, अशी ही मागणी राऊत यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews