‘त्या’ नुकसानीस आ.रोहित पवार जबाबदार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कुकडीचे आवर्तन न मिळाल्यामुळे कर्जत तालुक्‍यातील शेतकर्‍यांच्या नुकसानिस  लोकप्रतिनीधी या नात्याने आमदार रोहित पवार जबाबदार आहेत. अशी टीका भाजपचे प्रमुख नेते अशोक खेडकर यांनी केली आहे.

कुकडीचे पाणी न मिळाल्यामुळे तालुक्‍यातील शेतकरी भरडला गेला आहे. स्थानिक आमदार नवखे असले, तर त्यांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असणाऱ्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज होती.

त्यांनी आमदारांना मदत केली असती, तर कदाचित शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती. फाळके यांचा पाण्याचा चांगला अभ्यास आहे. मग त्यांनी ही माहिती आमदारांना का दिली नाही, हे पण कोडे आहे.

माजी मंत्री प्रा. राम शिंदे हे १० वर्षे आमदार होते. पाच वर्षे आमदार असताना पाण्यासाठी संघर्ष केला आणि नंतरचे पाच वर्षे ते मंत्री होते आणि आमचे सरकार होते. त्या काळात कुकडीचे पाणी हे शेतक-यांना मागणीपूर्वीच पाचही वर्षे त्यांनी सोडले. असा टोला देखील त्यांनी लगावला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24