आमदार रोहित पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ म्हणत पार्थला टोला लागवला !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :-  गेल्याचे अनेक दिवसांपासून सुशांत सिंग मृत्यूप्रकरण चांगलेच गाजले होते. यामुळं राज्यातील राजकारण देखील ढवळून निघाले होते. आरोप – प्रत्यारोप झाले. 

अखेर आज सुशांतच्या प्रकरणाचा अहवालास सर्वांसमोर आला. व आरोप कारण्याऱ्यांची तोंड गप्प झाली. सुशांतची हत्या नसून आत्महत्या आहे,

असं एम्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधकांनी तोंड न लपवता माफी मागावी, अशी मागणी केली होती.

रोहित पवार यांनी ट्वीट करून भाजप नेते आणि सुशांत प्रकरणावरून आरोप करणाऱ्यांना सणसणीत टोला लगावला आहे. विशेष म्हणजे, पार्थ पवार यांनीही या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

त्यामुळे रोहित पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ म्हणत पार्थ यांनाही चांगलाच टोला लगावला आहे. रोहित पवार म्हणाले की, ‘बिहार निवडणुकीसाठी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या मृत्यूचं भांडवल करू पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर AIIMS हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या टीमने दिलेल्या अहवालामुळे पाणी फेरले आहे. मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.

‘ असा टोलाच लगावला आहे. पवार वॉर… सुशांत प्रकरणात खुद्द पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत या प्रकरणाची सीबीआय तपासाची मागणी केली होती.

त्यांच्या या मागणीवरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे चांगलेच संतापले होते. ‘मी माझ्या नातव्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही,

तो अजून अपरिपक्व आहे’, असं म्हणत पवारांनी नातवाचा समाचार घेतला होता. पण, तरीही पार्थ पवार हे वारंवार आपल्याच पक्षाविरोधात वेगळी भूमिका मांडत होते.

‘सत्यमेव जयते’ म्हणत पार्थ यांनी पुन्हा एकदा ट्वीट करून खळबळ उडवून दिली होती. आता याच अनुषंगाने आमदार रोहित पवार यांनी ‘सत्यमेव जयते’ म्हणत पार्थला टोला लागवला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24