अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- कुकडीचा पाणी प्रश्न सध्या जिल्ह्यात चांगलाच गाजत आहे, श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते आणि माजीमंत्री राम शिंदे आज याच प्रश्नावर उपोषणास बसले होते.
याबाबत आमदार पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावेळी पवार म्हणाले, हा त्यांचा प्रश्न आहे. कुकडीचे आवर्तन यापूर्वी उन्हाळ्यात कधीच दोनदा सुटले नव्हते.
परंतु मतदार संघातील फळबागा, पिके व पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सुटावे यासाठी आपण जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी कालवा सल्लागार समितीच्या सदस्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.
यामुळे कुकडीचे आवर्तन टेल टू हेड ६ जून रोजी सुटणार आहे. त्यामुळे मी त्यांना (माजी मंत्री राम शिंदे, बबनराव पाचपुते) कसे सांगणार? हा त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्या मते कुकडीचे आवर्तन सुटणारच आहे. तर त्यांनी का उपोषणास बसावे. असा सवालही त्यांनी केला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews