मोदींच्या वाढदिवसाबाबत आमदार रोहित पवार म्हणाले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :-  नुकताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 70 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा विश्व झाला.

मात्र यांच्या वाढदिवशी सोशल मीडियावर राष्ट्रीय बेरोजगार दिवस पाळला गेला. याबाबत कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

देशाच्या पंतप्रधानांचा वाढदिवस व त्या दिवशी राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा केला जातोय, याचा आपल्याला खेद वाटत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.

देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान व त्यांच्याच वाढदिवसाच्या दिवशी अशाप्रकारे त्यांच्या विरोधात हॅशटॅग चालवणं किंवा मीम वापरणे हे भारतीय संस्कृतीला साजेसं नाही.

एकप्रकारे पंतप्रधान पदाचा हा अवमानच आहे, असंही रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. रोहित पवार यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आपलं म्हणणं मांडलं आहे.

आजची युवाशक्ती बेरोजगारीच्या भयंकर संकटात अडकली आहे. बेरोजगारी हा देशातील युवकांच्या समोरचा मोठा प्रश्न आहे आणि त्यामुळे युवक निराश झाले आहेत.

त्यामुळे अशा गोष्टी पुढे आल्या आहेत. कोरोनामुळे देशात बेरोजगारी, आर्थिक विकासदरात घट, आर्थिक तुटवडा, व्यवसाय उद्योगे डबघाईला आली आहे.

यामुळे संतप्त जनतेने राष्ट्रीय बेरोजगारी दिवसाला प्रोतसाहन दिले. मात्र हे चुकीचे असून देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीविषयी असे घडल्याने आमदार पवार यांनी खणत व्यक्त केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24