आमदार रोहित पवार म्हणतात ; ‘त्या’ आडव्या बांबूंना सरळ करू !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,22 जून 2020 :  बांबू हे कल्पवृक्षा सारखे आहे. ते त्रासदायक नसून उत्पादन देणारे आहे. तसेच कमी पाण्यात आणि अत्यल्प खर्च, मशागतीच्या तुलनेत कमी त्रास असे पीक आहे.

हा बांबू सरळ वर जातो मात्र राजकारणात काही आडवे बांबू असतात त्यांना विकासाभिमुख कामातून सरळ करू, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना टोला लगावला.कर्जत येथे एक कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले कि, बारामतीच्या धर्तीवर कर्जत – जामखेड मधील शेतकऱ्यांना शेती विषयी प्रशिक्षण, विविध प्रयोग आणि तज्ञाच्या नियमित मार्गदर्शनासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू.

मात्र शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पेक्षा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून परवडणारी शेती करावी. असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.

तसेच लोकप्रतिनिधी म्हणून अन्न, वस्त्र, निवारा, चांगले रस्ते, वीज यासह सर्व मूलभूत गरजा पूर्ण  करण्याचा प्रयत्न करणार आहोत असे म्हटले. यावेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24