आमदार रोहित पवार यांनी जनतेची माफी मागावी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 :   महापुरुषांच्या स्मारकासाठी मंजूर केलेला निधी आमदार रोहीत पवार यांनी गटार कामावर वळवून थेट महापुरुषांचाच अवमान केला आहे.

राजकारणासाठी अशा बाबीचा वापर करू नका आम्ही आमच्या सरकारच्या काळात हा निधी मिळविला होता, तो पाठविण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. खरंच विकासाचा पुळका असेल तर आपल्या सरकार कडून निधी मिळविण्याची धमक दाखवा.

मात्र नगरपंचायत च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीने सुडाचे राजकारण करू नका.असा आरोप कर्जत नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी केला.

तसेच महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी जनतेची माफी मागावी व महापुरूषांच्या सुशोभिकरणाचा निधी परत वर्ग करावा, अशी मागणी राऊत यांनी केली.

आमदार रोहित पवार यांनी सरकारमधील अधिकार्‍यांवर दबाव आणत फक्त कर्जत नगरपंचायतचा निधी अखर्चित राहिल्यामुळे इतर कामांवर वळविला याचे खास पत्र काढले गेले.

मात्र याअगोदरच काही दिवसापूर्वी त्यात अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायतीने २०१५ पासून चा अखर्चित निधी ३१ मार्च २०२१ पर्यंत खर्च करावा असे आदेश काढले आहेत. मग फक्त कर्जत नगरपंचायती साठीच वेगळा न्याय देण्यात आला.

असा प्रश्न कर्जत येथे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केला. कर्जत येथील नगर पंचायतीने शहरातील विविध १० चौकात महापुरुषांच्या स्मारकासाठी दोन कोटी,

शॉपिंग सेंटरसाठी सात कोटी रुपये व अंतर्गत रस्त्यांसाठी १ कोटी असा एकूण दहा कोटीचा निधी वैशिष्ठपुर्ण कामासाठी विशेष अनुदान म्हणून त्यावेळचे तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुुुळे मिळविला होता.

हा निधी आमदार रोहित पवार यांनी अधिकार्‍यांवर दबाव आणून महाराष्ट्रातील फक्त कर्जत नगर पंचायतीचा निधी, खास कर्जतसाठी स्वतंत्र पत्र काढून इतरत्र वळविला.

मात्र हा निकष महाराष्ट्रा तील इतर कोणत्याही नगर पंचायतीला का लावला नाही. सदर चौक काचा निधी पुन्हा त्याच कामांसाठी राहत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही

असा इशारा देत सदर चौकाची कामे आपल्याला कोणाला द्यायची असतील त्यांना द्या मात्र नगरपंचायत च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीचे राजकारण करू नका असे आव्हानही त्यांनी यावेळी केले.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन आमदार रोहित पवार यांचा निषेध करत या विरोधात तिव्र आंदोलन उभा करण्यात येईल असा इशारा ही या पत्रामध्ये दिला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24