आमदार रोहित पवार यांनी साधला कंगनावर निशाणा,म्हणाले अश्या ड्रामेबाजांना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :-  ‘कोरोना,बेकारी व आर्थिक संकटावरुन लक्ष हटवण्यासाठी तू बोलत रहा,आम्ही तुला सुरक्षा पुरवू’, अशी शंका मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा दिल्यामुळं येत आहे.

म्हणून दिशाभूल करणाऱ्या अशा ड्रामेबाजांना महत्त्व न देता दुर्लक्ष केलेलंच चांगलं व ही सुरक्षा फुकट नसेल, अशी अपेक्षा,’ असं ट्वीट करत रोहित पवार यांनी कंगनासह भाजपवर निशाणा साधला आहे.

सुशांत सिंग मृत्यू प्रकरणात अभिनेत्री कंगना रनौत आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मुंबई आणि मुंबई पोलीस बद्दल वादग्रस्त विधानाने सर्वच बाजूने कंगनावर टीका झाली.

दरम्यान,राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनीही कंगनावर निशाणा साधला आहे. कोरोना,बेकारी व आर्थिक संकटावरुन लक्ष हटवण्यासाठी तू बोलत रहा,आम्ही तुला सुरक्षा पुरवू’,

अशी शंका मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना Y दर्जाची सुरक्षा दिल्यामुळं येत आहे. म्हणून दिशाभूल करणाऱ्या अशा ड्रामेबाजांना महत्त्व न देता दुर्लक्ष केलेलंच चांगलं व ही सुरक्षा फुकट नसेल,

अशी अपेक्षा,’ असं ट्वीट करत रोहित पवार यांनी कंगनासह भाजपवर निशाणा साधला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रत्युतर देताना कंगनानं एक ट्विट केलं होतं.

मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटतेय? असं ट्विट केलं होतं. यानंतर राजकिय नेत्यांसह कलाकारांनीही कंगनाविरोधात तोफ डागली होती.

त्यानंतर कंगनानंही मी मुंबईत येतेय, कुणाच्या बापात हिंमत असेल तर रोखून दाखवा, असं आव्हान दिलं आहे. यावरून वातावरण अधिक तापलं आहे.

शिवसेना महिला आघाडीनं कंगनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यात कंगनाविरोधात आंदोलनं करण्यात येत आहेत. रोहित पवार यांनीही कंगनाला सूचक शब्दात सुनावले आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24