या खास कारणासाठी आमदार रोहित पवार मंत्री गडकरींच्या भेटीस

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- आपल्ल्या कार्यकुशलतेमुळे अल्पवधीतच जनमानसात पोहचलेले कर्ज – जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार हे सामाजिक कामामध्ये नेहमीच अग्रेसर राहतात.

नागरी समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारे रोहित पवार यांनी मतदारसंघातील रस्ते विकासासाठी केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

मतदारसंघातील विकासकामांना आमदार रोहित पवार कायम प्राधान्य देत असतात. आपल्या मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासाच्या कामासाठी त्यांनी मंत्री गडकरी यांच्याशी चर्चा केली.

यावेळी खर्डा ते कुर्डूवाडी हा पालखी मार्ग पूर्णत्वास नेण्याच्या मागणीसह मतदारसंघातील इतर रस्त्यांच्या विकासासाठी केंद्रीय रस्ते निधीस मान्यता देण्याची मागणी केली.

तसेच अपघातातील जखमींवर वेळेत उपचार करता यावेत यासाठी मिरजगाव परिसरात विशेष ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची मागणीही यावेळी केली.

कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे आमदार म्हणून निवडून आल्यापासून या रस्त्यांच्या कामासाठी रोहित पवार हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

त्यासाठी काल त्यांनी दिल्लीत गडकरी यांची दुसऱ्यांदा भेट घेऊन रस्त्यांच्या कामाबाबत सविस्तर चर्चा केली आणि मागण्यांचे निवेदन दिले.

त्याचबरोबर अहमदनगर-करमाळा-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गांच्या चौपदरी करण्याचे काम भारतमाला प्रकल्पांतर्गत प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

त्यामुळे या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी लवकरात लवकर कंत्राटदार नेमून काम सुरु करावे अशी विनंती त्यांनी गडकरी यांना केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24