आमदार रोहित पवार यांची ‘या’ समितीवर झाली निवड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-आपल्या कार्य कुशलता व जनमानसात आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करणारे कर्जत- जामखेडचे लोकप्रिय आमदार रोहित पवार हे आपल्या कार्यामुळे नेहमीच चर्चेत राहतात.

पुन्हा एकदा त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांची एका शाळेच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालय विकास समितीच्या सदस्यपदी आमदार रोहित पवार यांची नियुक्ती झाली आहे,

दरम्यान याबाबतची माहिती प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी दिली आहे.दादा पाटील महाविद्यालयाची ख्याती सर्वदूर आहे. येथील शिक्षण रयतच नव्हे तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रसिद्ध आहे.

आमदार रोहित पवार हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. त्यांच्यामुळे महाविद्यालय नक्कीच वरचे स्थान गाठेल.रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व दादा पाटील महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी

आमदार रोहित पवार यांच्या नियुक्तीमुळे महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास होण्यास मोठी मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24