आमदार रोहित पवारांचा निशाणा; लोकांच्या मनातील साहेब होणं सोप्प नाही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-  राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील काही लोकांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर शरद पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली. तिचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यावरून आमदार रोहित पवार यांनीही शरद पवारांच्या कोरोना टेस्टवरुन साहेब म्हणून घेणाऱ्यांना टोला लगावला आहे. सिल्व्हर ओक बंगल्यातील आतापर्यंत एकूण १२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात २ सुरक्षा रक्षक, स्वयंपाकी, वाहन चालक अशाप्रकारे कोरोना रुग्णांचा समावेश आहे.

शरद पवार हे पुढील काही दिवस कोणालाच भेटणार नाही असं सांगण्यात आलं आहे. आमदार रोहित पवार यांनीही शरद पवारांच्या कोरोना टेस्टवरुन निशाणा साधला आहे. फक्त नावापुढं साहेब लावणं सोप्पं असतंय, पण लोकांच्या मनातील साहेब होणं कोणाचंही काम नाही. रोहित पवार यांचा निशाणा कोणावर आहे हे अस्पष्ट आहे.

पण जे कामाशिवाय स्वत:ला साहेब म्हणून घेतात, त्या सर्वांनाच ही चपराक आहे. सिल्व्हर ओकवरील यापूर्वी सहा जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामध्ये सुरक्षा रक्षकांसह स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा समावेश आहे. यामुळे शरद पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली.

तिचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपेंनी दिली होती. परिसरात आलेल्या व्यक्तींच्या कोरोना चाचण्यादेखील करण्यात येणार असल्याचं टोपेंनी सांगितलं होतं. त्यानंतर आणखी ६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं कळालं आहे.

यावरुन आमदार रोहित पवार यांनी स्वत:ला साहेब म्हणून घेणाऱ्या नेत्यांना टोला लगावला आहे. ”साहेबांचे काही सुरक्षारक्षक पॉझिटिव्ह निघाल्याने काल साहेबांना भेटलो. पण स्वतःपेक्षा सुरक्षा रक्षक, कोरोनाचं संकट, पूरस्थिती, कोरोना वॉरियर्स व लोकांचीच अधिक काळजी करताना ते दिसले. फक्त नावापुढं साहेब लावणं सोप्पं असतंय.

पण लोकांच्या मनातील साहेब होणं कोणाचंही काम नाही!, असे ट्विट रोहित यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर केलं. शरद पवार गेल्याच आठवड्यात कराडला गेले होते. या दौऱ्यानंतर मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर शरद पवारांच्या सुरक्षा रक्षकांच्या कोरोना चाचण्यादेखील पॉझिटिव्ह आल्या.

त्यामुळे शरद पवारांची कोरोना चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आली आहे. शरद पवारांच्या दोन स्वीय सचिवांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोनाची लागण झालेल्या सिल्व्हर ओकवरील कर्मचाऱ्यांना वरळीतील एनएससीआय डोममध्ये उपचारांसाठी ठेवण्यात आलं आहे.

याशिवाय महापालिकेनं सिल्व्हर ओक परिसरात फिव्हर कॅम्पदेखील सुरू केला आहे. शरद पवार यांच्या कुटुंबीयांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवारांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24