अहमदनगर :- अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे कॉग्रेस -राष्ट्रवादी कॉग्रेस आघाडीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी मुहूर्त साधून मंगळवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यापूर्वी शहरातून प्रचार रॅली काढली होती, या रॅलीत चोरट्याचा धुमाकूळ दिसून आला.चोरटयांनी रॅलीतील तब्बल २० जणांच्या चैन ,मोबाईल व रोख रक्कमेवर डल्ला मारला.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली असून दोन संशयित चोरट्याना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .
त्यांची कसून चौकशी सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी सांगितले . संग्राम जगताप यांच्या निघालेल्या प्रचार रॅलीत मोठी गर्दी झाली होती ,
गर्दीचा फायदा चोरटयांनी घेतला रॅली माळीवाडा वेशीजवळ आल्यानंतर १० ते १२ चोरटे गर्दीत घुसले तेथे मोबाईल ,सोन्याची चैन मारण्यात आली.
त्यानंतर रॅली कापडबाजारात आल्यानंतर बाजारातील व्यापारी रॅलीत सहभागी झाल्यानंतर चोरटयांनी भारी मोबाईल ,रोख रक्कमेवर डल्ला मारला
यावेळी एका व्यापाऱ्याच्या खिश्यात हात घालत असताना एका भामट्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले तर एका जणाला संशयावरून पकडले ,
लोकांनी पकडून दिलेल्या चोरट्याने पाथर्डी येथील नाथनगरचा पत्ता सांगितले. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहे.
सभा संपल्यानंतर चोरी झालेल्या अनेकांनी पोलीस ठाण्यात येऊन आपली चोरी झाल्याचे सांगितले.
दरम्यान पोलिसांनी एक फिर्याद दाखल करून इतरांची नावे व चोरीस गेलेली रक्कम फिर्यादीत नोंद केली आहे .या घटनेमुळे बाजारपेठेत खळबळ उडाली होती .