अहमदनगर :- नगर दक्षिण मतदारसंघातून कॉंग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
मतदारसंघातील पारनेर तालुक्यातील जवळा येथील बबनराव रासकर व अंजनाबाई रासकर शेतकरी जोडप्याच्या हस्ते मुहूर्त साधत त्यांनी आपला अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान थोड्याच वेळात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची क्लेरा ब्रूस मैदानावर सभा होणार आहे. यावेळी काँग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्यातील दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.