आमदार संग्राम जगताप म्हणाले युवकांनी आपले…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : कोरोना संसर्गजन्य विषाणूवर मात करण्यासाठी देशामध्ये सलग तीन महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना खासगी नोकरी, व्यवसाय गमावावे लागल्यामुळे त्यांच्यावर व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.

संकटाच्या काळात संकटावर मात करुन आपले जीवन पूर्ववत करण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. या काळात प्रत्येकाला मदत व्हावी, यासाठी प्रामाणिक हेतून गेले तीन महिने शहरामध्ये आम्ही काम केले आहे.

याचबरोबर शहरातील विविध संस्थांनी गोरगरिब जनतेला अहोरात्र मदत केली आहे. आजचा युवकही पुढे येऊन विविध भागामध्ये काम करत आहे. वैदूवाडी येथील सूरज शिंदे यांनी दीडशे कुटुंबांना अन्नधान्याची मदत केली.

युवकांनी आपले व्यवसाय व नोकरी सांभाळून सामाजिक कामामध्ये अग्रेसर राहून काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.

वैदूवाडी येथे आ. संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्ताने सूरज शिंदे यांच्यावतीने अन्नधान्याचे दीडशे कुटुंबांना वाटप करण्यात आले.

यावेळी नगरसेवक मनोज दुलम, माजी नगरसेवक संजय चोपडा, जालिंदर शिंदे, अँड. विक्रम शिंदे, शिवा शिंदे, काशिनाथ शिंदे, नवनाथ शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सूरज शिंदे म्हणाले की, आ. संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक भावनेतून कोरोना संसर्ग विषाणूच्या काळात संकटात सापडणाऱ्या गोरगरिब गरजवंतांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला. वैदूवाडी येथील दीडशे कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24