अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :- सहकारी आणि खासगी असा भेदभाव न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट प्रति लिटर ५ रुपये अनुदान देवून दिलासा द्यावा अशी मागणी माजी मंत्री आ राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्र्यांकडे केली आहे.
आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्ह्य़ातील दुध संकलन केंद्रचालक आणि दूधसंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
यासंदर्भात प्रामुख्याने निर्माण झालेल्या प्रश्नाच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांना सविस्तर पत्र देवून दूध उत्पादक शेतकरी आणि दूध संघाच्या निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे.
नगर जिल्ह्यात दररोज २६ लाख लिटर दूध उत्पादन होते.यापैकी खासगी प्रकल्पांद्वारे १९.८७ लाख लिटर तर सहकारी दूध संघाकडून ६ लाख लिटर दूधाचे संकलन करून पॅकीग व उपपदार्थ निर्मिती करण्यात येते.
मात्र सध्याच्या टाळेबंदीच्या काळात संकलीत दूधाची विल्हेवाट करणे अत्यंत अवघड होवून बसल्याने राज्य सरकाराने दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने अतिरिक्त दूधाला प्रति लिटर २५ रुपये दर देवून खरेदी करण्याचा निर्णय घेतला.
परंतू सदर निर्णयानूसार फक्त सहकारी दूध संघानाच ठराविक कोटा ठरवून देवून दूध स्विकारले जात असून खासगी प्रकल्पांचे दूध स्विकारले जात नसल्याची बाब आ.विखे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणूंन दिली.
सहकारी दूध संघाकडे संकलीत सर्व दूध सुध्दा रुपातंरीत करण्यासाठी स्विकारले जात नसल्याने त्यांच्या समोरही द्विधा मनस्थिती झाली असूनच, शासनाच्या निर्णयामुळे प्रति लिटर दूधास २५ रुपये खरेदी भाव देणे बंधनकारक आहे.
परंतू खासगी प्रकल्पांचे दूध स्विकारले स्विकारले जात नसल्याने त्यांना कमी दराने विल्हेवाट लावावी लागत असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना कमी दराने पेंमेट केले असल्याने सहकारी व खासगी प्रकल्पधारक यांच्या दूध दरात तफावत निर्माण होवून शेतक-यांचा आर्थिक तोटा होत असल्याची बाब आ.विखे पाटील यांनी पत्रात विशेषत्वाने नमुद केली.
यापुर्वी अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर विधीमंडळाने मान्यता दिल्यानंतर दुध उत्पादक शेतक-यांना प्रतिलिटर ५ रुपये बॅंक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शेतक-यांना त्याचा आर्थिक लाभ झाला होता.
सध्याच्या आव्हाणात्मक परिस्थिती पाहाता सहकारी अथवा खासगी असा कोणताही भेदभाव न करता दुध उत्पादक शेतकरीच केंद्रबिंदू मानुन शासनाने प्रतिलिटर ५ रुपयांचे अनुदान बॅंक खात्यात जमा करावे आणि दुध भावाची निर्माण झालेली जिवघेणी स्पर्धा संपुष्टात आणावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करतानाच ग्रामीण भागातील तरुणांनी दुध उत्पादन व संकलन व्यवसाय सुरु केला आहे.
ग्रामीण भागात काही ठिकाणी खासगी प्रक्रीया प्रकल्पही सुरु केलेले आहेत. यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारणाला हातभार लागलेला आहे परंतू, वाढती स्पर्धा आणि भावातील तफावत त्यामुळे या छोट्या प्रकल्पांपुढील आर्थिक संकट दुर करायचे असेल तर समान न्यायाने सरकारने विचार करावा असे आ.विखे पाटील अशी आ.विखे पाटील यांनी केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com