अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आमदार व तहसीलदार मटण पार्ट्यांना उपस्थित !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे व तहसीलदार मुकेश कांबळे, नगरपंचायतचे अनेक नगरसेवक व मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल हे कन्टेनमेंट व बफर झोनमध्ये आषाढ मटणाच्या पार्ट्यांना उपस्थित राहून फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत असल्याचे शुक्रवारी अकोल्यातील नागरिकांनी अनुभवले.

अगस्ती कारखाना रोडलगत राष्ट्रवादीच्या नवनियुक्त महिलाध्यक्ष व नगरसेविका स्वाती शेणकर व त्यांचे पती संदीप शेणकर यांनी निमंत्रित केलेल्या ‘त्या पार्टीत’ आरोग्य विभागाकडून स्वॅब तपासणी करून आलेल्या अहवालातील कोरोना बाधित व्यक्तीही उपस्थित होती.

या पार्टीत आमदार व तहसीलदार यांच्याबरोबरच महत्त्वपूर्ण जबाबदार पदाधिकाऱ्यांसह अनेकजण उपस्थित होते. जिल्हा व राज्य प्रशासनाकडून याबाबत चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केली. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवण्यात आले.

अकोले तालुका कोरोनामुक्त होत असून नागरिक काळजी घेत असताना तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार डॉ. किरण लहामटे हे तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या समवेत रेड झोनमधून होत असलेल्या मटण पार्ट्यांना उपस्थित राहत आहेत. त्या पार्टीत राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिवाय एक कोरोना पॉझिटीव्ह पदाधिकारीही उपस्थित होता. बाधित रुग्णासमवेत या सर्व लोकांनी भोजन घेतले. तालुक्याचे लोकप्रतिनिधी हे नियम पाळत नाहीत. यापूर्वी शिवभोजन थाळीचे उद््घाटनही कोणतेही नियम न पाळता करण्यात आले होते. कोरोना रोखण्याबाबत नियम लोकप्रतिनिधींना का लागू होत नाहीत?, असा सवाल त्यांनी केला.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24