आ. संग्राम जगताप यांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब ? कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर – अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी कांग्रेसचे नगर शहराचे आ. संग्राम जगताप हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा मध्यंतरी थंडावली होती. मात्र आज पुन्हा एकदा या चर्चेने जोर धरला.

मुंबईत सेना पदाधिकार्‍यांसमवेत झालेल्या गुप्त बैठकीत आ. जगताप यांच्या सेना प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे वृत्त वार्‍यासारखे पसरले. मात्र यासंदर्भात आ. जगताप यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी केवळ ‘नो काॅमेंट्स’ असे म्हणत अधिक भाष्य करण्याचे टाळले.

मध्यंतरी सुरु असलेल्या या चर्चेसंदर्भात खुलासे देताना आ. जगताप यांची चांगलीच दमछाक झाली होती. आपण पक्षांतर नाही, असे त्यांनी नगरच्या पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले होते.

मात्र मुंबईत दि. २९ रोजी शिवसेना पदाधिकार्‍यांसमवेत झालेल्या चर्चेत आ. जगताप यांच्या पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. दरम्यान, या चर्चेने अहमदनगर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र चलबिचल सुरु झाल्याचे वृत्त आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24