नेत्यांनी सोडले तरी जनता काँग्रेसच्या पाठिशी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

शिर्डी :- भारताची ही प्रगती मागील पाच वर्षात नसून ६० वर्षांची देण आहे.काँग्रेसने उभ्या केलेल्या नेत्यांनी काँग्रेसला सोडले तरी जनता मात्र काँग्रेसच्याच पाठिशी आहे, असे प्रतिपादन आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले.

राहाता येथील घोलप मंगल कार्यालयात आयोजीत तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता शिबिरात ते बोलत होते.यावेळी राहाता येथील काँग्रेस कार्यालयाचे उद्घाटन आ. डॉ. तांबे यांच्या हस्ते झाले.

या कार्यकर्ता शिबिराच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे रावसाहेब बोठे हे होते तर कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळूंखे,डॉ. एकनाथ गोंदकर, ज्ञानदेव वाफारे, बाळासाहेब केरुनाथ विखे, राष्ट्रवादीचे अरुण पाटील कडू, एकनाथ घोगरे उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24