मंत्री राम शिंदे कडून जलसंधारणाच्या कामात गैरव्यवहार,मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- नगरचे पालकमंत्री तथा तत्कालीन जलसंधारण मंत्री असलेले प्रा.राम शिंदे यांनी जलसंधारणाच्या प्रत्येक कामात टक्केवारी घेऊन गैरव्यवहार केला आहे.

यामुळे त्यांच्या संपत्तीची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी अहिल्यादेवींचे वंशज अक्षय शिंदे यांनी केली.

या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात गृह शाखेचे उपचिटणीस यांना देण्यात आले.

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जलसंधारणाच्या कामामध्ये झालेल्या गैरव्यवहाराबद्दल तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता.

या प्रश्‍नाला उत्तर देताना विद्यमान जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी जलसंधारणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले असून, यासाठी उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करत असल्याचे सांगितले.

प्रा. राम शिंदे यांनी 2009 निवडणुकी वेळी प्रतिज्ञापत्रात त्यांच्या संपत्तीचे विवरण देण्यात आले होते.पूर्वी व सध्याच्या संपत्तीत मोठी वाढ झाली असून, शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात पैसा मिळवला आहे.

याच कमाईमधून त्यांनी 10 कोटींचा अलिशान बंगला बांधला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पालकमंत्री शिंदे यांनी जलसंधारणाच्या कामात केलेल्या गैरकारभाराची व त्यांच्या संपत्तीची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करावी,

ओबीसी मंत्री असताना स्वतःच्या सासर्‍यास निवासी शाळा चालविण्यास दिल्या आहेत. तसेच नाशिक, बारामती एमआयडीसी कंपन्यांत असलेली भागिदारी याची देखील निवृत्त न्यायधिशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24