अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :-बचत गटातील अनेक महिलांनी कर्ज घेतले आहे पण व्यवसायच बंद पडल्यामुळे ते कर्ज भरू शकत नाहीत. तसेच कोरोनामुळे व्यवसाय पूर्ण ठप्प असल्याने हाती भांडवल उपलब्ध नाही.
महिलेने घेतलेले पूर्ण कर्ज म्हणजे तिचे भांडवल बुडाले आहे, ती महिला पूर्ण संकटात सापडली आहे. तरी या संकटात सरकारने त्यांच्या मागे उभे राहून महिला बचत गटांंवर असणारे सर्व कर्ज माफ करावे,
अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील महिला बचत गटातील महिलांना मायक्रो फायनान्स कंपनी कडून होत असलेल्या प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मायक्रो फायनान्सचे कर्मचारी रोजच त्या महिलांच्या घरी जाऊन वसुलीसाठी तगादा लावत आहेत, धमकी देत आहेत, घरातील साहित्य उचलून नेत आहेत,
पैसे द्या नाही तर तुमचा टी व्ही ,फ्रिज, गॅस, भांडी घेऊन जातो अशी धमकी देत आहेत, महिलांना अश्लील बोलणे, शिविगाळ करणे,
त्यांच्या घरात बसून राहणे, शरीर सुखाची मागणी करणे, असे मायक्रो फायनान्स चे गुंड करत आहेत.त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच पतसंस्था, बँकांकडील महिला बचत गटाचे संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
याप्रसंगी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेनेचे प्रदेश अध्यक्ष दिलीप धोत्रे, सरचिटणीस अनिल चितळे, उपाध्यक्ष डि.एन.साबळे, ज्ञानेश्वर गाडे, जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, सचिव नितीन भुतारे,
देवीदास खेडकर, दत्ता कोते, बाबासाहेब शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा अॅड.अनिता दिज्ञे, उपाध्यक्ष मनोज राऊत, मारुती रोहोकले, पप्पू लामखेडे, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, मनसेच्या विविध विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved