महाराष्ट्र

MNS : मनसेला त्यांच्या जाण्याने काही मोठे खिंडार पडले नाही; वसंत मोरेंचा रुपाली पाटीलांवर घणाघात

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

पक्षातील अंतर्गत वादामुळे त्यांनी राजीनामा दिला असल्याचे समजत आहे. त्यातच आता पुणे महानगरपालिकेत मनसेचे नगरसेवक असणारे वसंत मोरे (Vasant More) यांनी रुपाली पाटील यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

पक्षातील रिकामटेकड्या नेत्यांकडून आपल्याला त्रास होत असल्याचे रुपाली पाटील यांनी म्हंटले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्यांच्या जाण्यानं काही मोठे खिंडार पडले नसल्याचे वसंत मोरे यांनी म्हंटले आहे.

तसेच पक्षात कोण रिकामटेकड आहे हे त्यांनी सिद्ध करावे असे आव्हानही त्यांनी केले आहे. वसंत मोरे यांनी सांगितले की, रुपाली पाटील यांना राजीनामा द्यायचाच होता.

हा त्यांचा सगळं प्री प्लॅन आहे. तुम्हाला येत्या पुणे महानगरपालिकेत मनसेची ताकत दिसेलच. राहिला प्रश्न अंतर्गत वादाचा तर हा विषय मी स्वतः राज ठाकरे (Raj Thakare) आणि शर्मिला वहिनींसमोर मिटवला होता.

असे नगरसेवक वसंत मोरे यांनी सांगितले. या सर्व घडामोडीनंतर नगरसेवक वसंत मोरे यांचे एक ट्विट सध्या सोशल मीडियावर चाललेच व्हायरल होत आहे.

मोरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतचा स्वतःचा आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांचा फोटो ट्विट करत कॅप्शन दिले आहे. जब हम दो साथ खडे तो सबसे बडे, अजून तात्या आणि साई भक्कम उभे आहेत’ असे कॅप्शन दिले होते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office