अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :- सध्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे रेणू शर्मा यांनी केलेल्या बलात्काराच्या आरोपामुळे अडचणीत आले आहे. रेणू शर्मा यांनी ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.
रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपांमुळे सामाजिक न्यानमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची विविध स्तरातून तसेच विरोधी पक्षातून मागणी होत आहे. या बाबत राष्ट्रवाईचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा आपले परखड मत मांडत हे आरोप अत्यंत गंभीर आहे असे म्हटले आहे.
आता या प्रकरणा मध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे. मुंडे यांच्या विरोधात आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिले बाबत भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी तक्रार दाखल केली आहे.
त्यांनंतर अजून एक ट्विस्ट म्हणजे मनसे नेते मनीष धुरी यांनी सुद्धा रेणू शर्मा या महिलेवर धक्कादायक आरोप केले आहेत आणि रेणू शर्मा हि महिला एक ब्लॅकमेलर तसेच खंडणी मागणी करणारी व धमकी देणारी महिला असल्याचे सांगितले आहे.
आता धनंजय मुंडे यांच्या प्रकरणाला या दोन गोष्टींमुळे नवे वळण प्राप्त झाले आहे. मनसे नेते मनीष धुरी यांनी म्हटले आहे कि या महिलेने माझा मोबाइल नंबर कुठून तरी मिळवला आणि मला फॉलो केले आणि माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. मी तिच्यापासून दूर राहण्याच्या प्रयत्न केला. २०१८-१९ मध्ये तिने अनेकदा पैसे उकळण्यासाठी माझ्या संपर्कात आली होती.