महाराष्ट्र

Dhangar Reservation : सरकारकडून धनगर समाजाची थट्टा ! झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी…

Published by
Ahmednagarlive24 Office

Dhangar Reservation : धनगर आरक्षणासाठी यशवंत सेनेच्या वतीने तालुक्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ चौडी येथे १४ दिवस उपोषण करण्यात आले. सरकारने या उपोषणाची दखल घेतली नाही, हे सरकार धनगर समाजाची थट्टा करत आहे,

त्यामुळे झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी चौंडी येथे मंगळवार, दि. २४ ऑक्टोबर (दसऱ्याच्या) दिवशी धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी, यासाठी महामेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेब दोडतले यांनी मंगळवार दि. १० रोजी चौंडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यशवंत सेनेच्या वतीने धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडीत तब्बल २१ दिवस आमरण उपोषण करण्यात आले होते. या वेळी सरकारच्या वतीने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्या लेखी आश्वासनानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले होते.

या वेळी सरकारने ५० दिवसांची मुदत मागितली होती.. मात्र, १५ दिवस होऊनही अद्याप सरकारने आरक्षणाबाबत हालचाली केल्या नाहीत, असे दिसून येत आहे, त्यामुळे महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.

पत्रकार परिषदेस यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले, प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब दांगडे प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे पाटील, राष्ट्रीय संघटक गोविंद नरवटे, उपोषणकर्ते आण्णासाहेब रूपनवर, नितीनदादा धायगुडे, बाळा गायके, स्वप्निल मेमाणे, दिलीप गडदे, शांतीलाल नाना कोपनर, दत्ताजी काळे, किरण धालपेंसह पदाधिकारी उपस्थित होते

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office