नगर जिल्ह्यात मोदींचा ‘जबरा फॅन’, भाजपाच्या विजयानंतर केले ‘हे’ काम

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देशातील जनतेचं किती प्रेम आहे हे निकालावरुन स्पष्टच झालंय. पण, नगर जिल्ह्यात एक वेगळीच घटना समोर आली आहे.

येथील एका तरुणाने मोदींच्या विजयानंतर आनंदात चक्क गावाला दंडवत घातले. दरम्यान या मोदी च्या फॅन ची राज्य भर चर्चा सुरू आहे.

मोदी जिथे जातात तिथे त्यांचे लाखो फॅन आहे मोदी जिथे जातील तिथे मोदी मोदी चा जल्लोष केला

जातो पंतप्रधान मोदींच्या या सगळ्या चाहत्यांमध्ये अहमदनगर मधील संगमनेर खुर्द गावचा भगवान निर्मल वेगळा ठरला.

कारण त्याने आगळ्या वेगळ्या पद्धतीने गावकऱ्यांचे आभार मानले त्याने चक्क सगळ्या गावाला दंडवत घालून आभार मानले.

भगवान यांनी त्यांच्या छातीवर 56 इंच अस लिहिलंय आणि पाठीवर नमो आणि चौकीदार अस लिहिलंय.

निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर मोदींना बहुमत मिळताच ढोल ताश्यांच्या गजरात त्याने गावाला दंडवत घालले.

या वेळी भाजपा कार्यकर्ते त्याच्यावर गुलाल उधळत होते भगवान च्या दंडावताचा स्वीकार करण्यासाठी गावकर्यांनी चांगलीच गर्दी केली होती.

भगवान एक शेतमजूर आहे भगवान याने नवस केला होता देशात भाजपचे सरकार यावे आणि या सरकार कडून लोककल्याण कारी काम व्हावे,

म्हणून त्याने गावातील शितला माता मंदिर ते दक्षिण मारुती मंदिर या मध्ये दंडवत घातले.

दरम्यान भगवान याला भाजप सरकारच्या कोणत्याच योजनेचा फायदा झालेला नाही,मात्र त्याच्या नातेवाईकांना भाजप सरकारने राबविलेल्या योजनांचा फायदा झाल्याचे तो सांगतो.

अहमदनगर लाईव्ह 24