मोदी-शहा त्यांच्या संकल्पनेला भाजपमधून छेद ; झालेय ‘असे’ काही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संकल्पनेतून प्रत्येक बुथवर पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने 25 ते 30 जणांची बुथ कमिटी नेमून या समितीच्या बुथ प्रमुखालाच त्या समितीच्या अध्यक्षाचे घटनात्मक पद देण्यात आले.

बुथ प्रमुख म्हणजेच स्थानिय समिती अध्यक्षांमधून मंडलाध्यक्ष निवडण्यात येईल, असे पक्षाच्या घटनेत अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आले आहे.

बुथ प्रमुखांना अधिकृतपणे मंडलाध्यक्ष निवडीचा अधिकार पक्षाच्या घटनेत देण्यात आला आहे. परंतु यालाच छेद देण्यात आल्याचा आरोप श्रीरामपुरात बूथ प्रमुखांकडून होतोय.

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील बुथ प्रमुखांच्या मताला कवडीचीही किमत न देता श्रीरामपूर शहर व तालुका मंडलाच्या अध्यक्ष पदाच्या नियुक्त्या केल्याच्या निषेधार्थ सर्व बुथ प्रमुखांनी राजीनामे दिले.

जिल्हाध्यक्ष गोंदकर यांच्याबाबत श्रीरामपुरात रोष दिसून आला. या निवडीच्या निषेधार्थ या मतदार संघातील 231 बुथ प्रमुखांपैकी 213 बुथ प्रमुख तसेच 44 शक्ती केंद्र प्रमुख अशा एकूण 257 प्रमुखांनी आपल्या पदाचे सामुहिक राजीनामे दिले.

हे सर्व राजीनामे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविले आहेत. मुलभूत घटनादत्त अधिकारालाच हरताळ फासून प्रत्यक्ष काम करणार्‍या संघटनेला कट कारस्थान करुन,

वरिष्ठांची दिशाभूल करुन उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी अत्यंत कावेबाजपणे संपविण्याचा प्रयत्न केला गेला. बुथ प्रमुखांना असलेल्या मंडलाध्यक्ष निवडीच्या अधिकारामध्ये शहराध्यक्ष पदासाठी अभिजीत कुलकर्णी यांचे तालुकाध्यक्ष पदासाठी मदन चौधरी यांचे नांव सुचविले होते.

त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन बुथ प्रमुखांची मते डावलून श्रीरामपूर शहर व तालुका मंडलाच्या अध्यक्षपदाच्या नियुक्त्या केल्या गेल्या असा आरोप करण्यात येत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24