अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- राहुल गांधी यांच्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी टीका केली आहे. राहुल गांधी माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहेत.त्यांच्यापेक्षा मला शेतीबद्दल जास्त माहिती आहे, अशा शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
त्यांनी ‘एएनआय’ ला दिलेल्या मुलाखतीत हि टीका केली आहे . नवीन शेतकरी कायद्यातील काही घटक शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत .केवळ हो किंवा नाही अशा स्वरूपात चर्चा होऊ शकत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांशी आम्ही संवाद साधला आहे. शेतकरी आंदोलनासंदर्भात माझ्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी पण दुःखी आहेत.
शेतकऱ्यांसोबत या संदर्भात खोलवर चर्चा करावी लागेल. लवकरात लवकर तोडगा सरकार काढेल, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनातून भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यांनी भाजपला खलिस्तानवादी आणि नक्षलवादी पण म्हटले होते. त्या टीकेवर आज राजनाथ सिंह यांनी पलटवार केला आहे.
आम्ही शेतकऱ्यांचा सन्मान करतो. शेतकरी देशाचे अन्नदाते आहेत. मी शेतकरी कुटुंबात जन्म घेतला आहे. शेतकरी देशाचे अन्नदाते आहेत. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांविरोधात निर्णय घेऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. कॅनडा देशाच्या पंतप्रधानांच्या टीकेला उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी सांगितले,
भारताच्या अंतर्गत मुद्यावर बोलण्याचा दुसऱ्या देशातील पंतप्रधानांना अधिकार नाही. त्यांनी या गोष्टीपासून दूर राहावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे योग्य नाही. ते देशाचे पंतप्रधान असून खालच्या पातळीवरील टीका खेदजनक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.