अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात लाळ खुरकूत रोग प्रतिबंध लसीकरण तसेच सर्व जनावरांचे टॅगिंग करून त्यांच्या ऑनलाईन नोंदी करण्यात येत आहेत.
तालुक्यातील 171 गावांमध्ये एक लाख 67 हजार 900 जनावरांचे लाळ खुरकूत लसीकरण व बिल्ले मारण्याचे काम 31 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करावयाचे असून, अत्तपर्यंत संगमनेर तालुक्यात 64 टक्के काम पूर्ण झाले आहे.
दरम्यान राज्यभरात जनावरांच्या रोग नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या लाळ व खुरकूत अभियानास सुरवात झाली आहे. या अंतर्गत संगमनेर तालुक्यात हे उत्कृष्ठ काम करण्यात आले आहे.
तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील साखर कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी येणारी जनावरे, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती यांना पत्र देऊन परिसरातील बाहेरच्या जिल्ह्यातील ऊस तोडणी किंवा विक्रीत आलेल्या सर्व जनावरांना लाळ खुरकुत,
लंपी स्क्रीन व डिसीज या रोगांच्या प्रतिबंधासाठी लसीकरणाची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
संगमनेर पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत पोखरकर यांच्यसह अनेक वैद्यकीय डॉक्टर व अधिकारी तसेच तालुक्यातील खासगी पशुवैद्यकिय चिकीत्सक सहभागी झाले आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved