अमरावती ;- हैदराबादमध्ये एका डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची जाळून हत्या करण्यात आल्यानंतर संपूर्ण देशभरात निषेध नोंदवला जात असताना अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर आलीय.
अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेसह तिच्या २१ वर्षीय मुलीवर दहा जणांनी सामूहिक अत्याचार केल्याच्या तक्रारीवरून अंजनगाव सुर्जी पोलिसांनी रविवारी (दि. १५) दहा जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. गुड्ड्या इंगळे (३०), शिवा (३०), नितीन घन (३५), आशिष ढेंगे (३२) रवी ढेंगे (३५), बाबासाहेब गायगोले (३५), नानासाहेब गायगोले (३२), सुधीर बोरखडे (३५) यांच्यासह अन्य दोघांविरुद्ध पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.