Motor Insurance : तुमच्या गाडीच्या सुरक्षिततेसाठी पॉलिसी क्लेम असणे खूप गरजेचे आहे. कारण दुर्दैवाने आपले वाहन चोरीला गेल्यास किंवा अपघातासारखी समस्या उद्भवल्यास वाहन विमा पॉलिसी ही आपल्याला आर्थिक मदत करते.
अशा वेळी जर तुमच्या गाडीचा विमा पॉलिसी सतत रिजेक्ट होत असेल आणि आपल्याला ही समस्या टाळायची असेल. तर आपण पुढे दिलेल्या स्टेप्स फॉलो करू शकता.
क्लेम रिजेक्शन समस्यापासून वाचण्यासाठी उपाय
एखादे वाहन चोरीला गेले अथवा अपघात झाला, तर आपण अगोदर विमा कंपनीला कळवावे. त्याचप्रमाणे आपल्या नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी व त्याची प्रत विमा आपण कंपनीला द्यावी. या प्रोसेस नंतर विमा कंपनीकडून नुकसानीची आपल्याला माहिती दिली जाईल.
गाडीच्या CNG किट बद्दल जाणून घ्या
गाडीच्या दुरुस्तीच्या खर्चाचा भार हा कंपनी घेईल. त्याचबरोबर आपल्या गाडीची कागदपत्रे आणि टर्म-कंडीशन यांची तपासणी केली जाईल. दुसरीकडे, जर आपण कारमध्ये सीएनजी किट बसवले असेल, तर आपल्याला पॉलिसी रिन्यू करत असताना त्याची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर विमा कंपनी यावर आपल्या गाडीच्या प्रीमियमची रक्कम जोडेल.
गाडीचा क्लेम रिजेक्ट होण्याचे कारण
आपण जर विमा उतरवलेले वाहन वैयक्तिक म्हणून घोषित केले असेल आणि आपण ते वाहन व्यावसायिक कारणांसाठी वापरले तर, विमा कंपनी आपला दावा नाकारेल. कंपनीने दिलेल्या एरियाच्या बाहेर अपघात झाल्यास, आपला गाडीचा क्लेम रिजेक्ट केला जाऊ शकतो.
वाहन चालकाने अल्कोहोल किंवा ड्रग्सच्या प्रभावाखाली वाहन जर चालवले असेल तर क्लेम रिजेक्ट होईल. गाडीचा क्लेम रिजेक्शन टाळण्यासाठी विमा पॉलिसीच्या अटी आणि नियम यांची माहिती जाणून घ्या.