देवेंद्र फडणवीस म्हणाले माजी खासदार दिलीप गांधी विधानपरिषद किंवा राज्यसभेत दिसू शकतील…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 : ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत राजू परुळेकर यांनी फडणवीस यांना विविध प्रश्नांवर बोलते केले.आणि फडणवीस यांनीही त्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली.

या मुलाखती मध्ये सुजय विखे पाटील यांना अहमदनगर मधून लोकसभेची उमेदवारी का दिली? या प्रश्नावर फडणवीस यांनी थेट उत्तर दिले आहे.

या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले अहमदनगरमध्ये उमेदवारीसाठी काही नावे होती. ती नावे असताना राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यांच्या मुलाने लोकसभेसाठी जवळपास चार वर्षे मेहनत घेतली होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दरम्यान पुढे फडणवीस म्हणाले कि, दिलीप गांधी हे व्यक्ती चांगले आहेत, त्यांनी कामंही केली आहेत. पण तरीही इन्कम्बन्सी दिसली. त्यामुळे आम्ही बदल केला. याचा अर्थ दिलीप गांधी राजकारणात संपले असं नाही.

उद्या गांधी तुम्हा पु्न्हा दुसऱ्या कुठल्या पदावरती दिसतील. गांधी पुढे कदाचित आमदार, खासदार, विधानपरिषद किंवा राज्यसभेत दिसू शकतील”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24