अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : शहरातील उड्डाणपुलाच्या संदर्भातील 99 टक्के जागा हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लवकरच या उड्डाणपुलाचा विषय मार्गी लागेल असे प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केले.
तसेच अमृत योजनेच्या संदर्भात अनेक ठिकाणी कामे संथ गतीने चालत असून, नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे, ही बाब योग्य नसून तत्काळ कामे मार्गी लागण्यासाठी नियोजन करावे असे, निर्देश मनपा प्रशासनाला दिले.
महानगरपालिकेमध्ये खासदार डॉ. सुजय विखे यांच्या उपस्थिती विविध विषयासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी विखे म्हणाले की, उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात मध्ये मी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आहे. लष्कराची असलेली जागा हीसुद्धा अधिग्रहित करण्याची प्रकिया पूर्ण झाल्या असल्यामुळे त्याचा विषय लवकरच मार्गी लागेल.
उड्डाणपुलाच्या संदर्भामध्ये ज्यां जागा अधिग्रहित करायच्या होत्या त्याचे 99 टक्के काम पूर्ण झालेले आहे. लवकरच उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागेल.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, सभागृह नेता स्वप्नील शिंदे, नगरसेवक महेंद्र गंधे, मनोज कोतकर,राहुल कांबळे, रवींद्र बारस्कर, अनिल बोरूडे, नगरसेविका पल्लवी जाधव, सतीश शिंदे, धनंजय जाधव, निखिल वारे, आयुक्त श्रीकांत मायकलवार,
महावितरणचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, उपायुक्त प्रदीप पठारे, कार्यकारी अभियंता एस.जी. सराफ, उपअभियंता अजय मुळे, जे.डी. बीवाल, यंत्र अभियंता निकम आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews