अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मी भाजपमध्ये नाराज नाही. पक्षाचे तालुकाध्यक्ष निवडीचे अधिकार संघटनेला होते. भविष्यातही आपण पक्षात प्रामाणिकपणे काम करू. मी सर्वसामान्य लोकांतून निवडून आलो आहे. पक्षाचे काम करणे ही माझी नैतिकता आहे, अशी माहिती खासदार सुजय विखे यांनी दिली.
भारतीय जनता पक्षाने लोकसभेची उमेदवारी दिली. वडिलांना राज्याचे मंत्रिपद दिले. आजमितीस पक्षात मानसन्मान देखील मिळत आहे. असे असताना आम्हाला दुसर्या पक्षात जाण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीच्या काळात परिस्थिती वेगळी होती. मी काँग्रेस पक्ष कशामुळे सोडला हे सर्वांना माहित आहे. माझ्यामुळे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भाजपात यावे लागले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते. मी भाजपमध्ये का आलो? हे सर्वांना माहीत आहे. पक्षबदलाची कारणेही सर्वांनाच माहिती आहेत. माझ्यामुळे वडिलांना देखील पक्ष बदलावा लागला. भाजपने आम्हाला योग्य स्थान दिले आहे. मला पक्षाचे तिकीट दिले, वडिलांना मंत्रिपद दिले. पक्षाने आम्हाला मानसन्मान दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com