खासदार सदाशिव लोखंडे पुन्हा झाले ‘गायब’ !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशावर कोरोना आजाराने थैमान घातले असताना लोकप्रतिनिधी आपआपल्या मतदारसंघात लक्ष ठेवून आहेत.

पण शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी कोरोनाच्या संकटकाळी पाठ फिरवली आहे.

सर्वत्र करोनो आजाराने थैमान घातले असताना सर्व ठिकाणी कर्फ्यु लावल्याने गरीब जनतेला काहीच आधार राहिला नाही.

लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनता दररोजच्या जीवन खडतर झाले आहे. गोरगरीब जनतेचे हाल होत आहेत.

अनेक मतदारसंघात संबंधित लोकप्रतिनिधी नागरिकांना आधार देतात किंवा काही विशिष्ट मदत होईल, असे काम करत आहेत.

पण सलग दोन वेळा शिर्डीचे खासदार असलेले लोखंडे पुन्हा नेहमीप्रमाणे गायब झाले आहेत.

लोकप्रतिनिधी नात्याने त्यांनी दायित्व घेतले नाही.कोरोनासारख्या महामारीने गेल्या अनेक दिवसांपासून जनता घरात बसून आहे.

या भागात आजही रोजंदारी काम करणारी जनता मोठ्या प्रमाणात आहे.लोकसभा निवडणुकीपासून यांचे मतदारसंघात दर्शन नाही.

यामुळे सर्व सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडून दिले असल्याची भावना आज अनेकांनी व्यक्त केली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24