भाजप चा हा खासदार राष्ट्रवादीच्या वाटेवर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / पुणे : भाजपचे  खासदार संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची सूत्रांची माहिती मिळते आहे. पवारांकडून आपल्याला निमंत्रण आल्याची माहिती काकडे यांनी दिली आहे. संजय काकडे जळगावमध्ये राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळावी, अशी काकडेंची अपेक्षा आहे. मात्र, काकडेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली जाणार आहे .

भाजप उदयनराजे यांच्या उमेदवारीवर ठाम असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे काकडे नाराज आहेत. दरम्यान, संजय काकडे यांनी याअगोदर अनेकदा वादग्रस्त वक्तव्य करुन भाजपला अडचणीत आणलं आहे.

त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. याशिवाय काही महिन्यांपूर्नी संजय काकडे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली होती. त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांची मनधरणी करण्यात यश आलं होतं.

त्यामुळे काकडे यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय मागे घेतला होता. मात्र, आता पुन्हा तशीच चर्चा सुरु झाली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24