अहमदनगर :- कोरोना पार्श्वभूमीवर महसूल, पोलिस, आरोग्य कर्मचारी व सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून महाराष्ट्राला कोरोना पासून लांब ठेवत आहेत.
त्यांच्या या कामगिरीमुळे आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झालेला नाही. कोरोनाच्या लढाई मध्ये ह्या योध्यांची महत्त्वाची भूमिका आहे.
हरियाणा सारख्या राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता दिला आहे. मात्र महाराष्ट्र शासन आपल्या कर्मचारी वर्गाची पगार कपात करणार असल्याचे वृत्त वृत्तपत्र आणि दृकश्राव्य माध्यमातून समजले.
परंतु असे न करता इतर विकासकामांचा निधी कमी करुन या सेवा देणाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता द्यावा अशी मागणी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
दुसरीकडे फळबाग शेतकऱ्यांनी अत्यंत मेहनतीने पिकविलेला शेतमाल मातीमोल दराने विकला जात आहे. महाराष्ट्र शासनाने पणन महामंडळ अथवा नाफेड सारख्या संस्थामार्फत
या शेतमालाची खरेदी करून रास्त दरात शहरातील नागरिकांना उपलब्ध करून दिल्यास शेतकरी व सामान्य नागरिक व शेतकऱ्यांची हाल-अपेष्टा थांबवता येईल. याकडेही खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®