खासदार सुप्रिया सुळे म्हणतात स्वच्छता हाच गावचा आत्मा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- गावातील प्रत्येक नागरिकाने आपले गाव , कुटुंब स्वच्छ ठेवणे कर्तव्य व आपली जबाबदारी आहे.

ग्रामीण विकासामध्ये स्वच्छता हा कुटुंबाचा व त्या गावचा आत्मा आहे. प्रत्येकाने गाव स्वच्छ ठेवून गावाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

मुंबई येथे खासदार सुळे यांची पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावात गेल्या दोन वर्षापासून राबविण्यात येत असलेल्या कचरा संकलन व खत निर्मिती प्रकल्पाबाबत त्यांना गावात तिल कार्यकर्ते क्षेत्रे यांनी माहिती देऊन,

या अभियानाकडे खासदार सुळे यांचे लक्ष वेधले. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई युवा प्रदेशाध्यक्ष अॅड निलेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई दक्षिण जिल्हा अध्यक्ष सचिन नारकर,

सुरज क्षेत्रे उपस्थित होते. ग्रामीण भागात प्रत्येकाने सामाजिक भान राखून दररोज घर परिसर गावात गोळा होणाऱ्या कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली पाहिजे जेणेकरून संपूर्ण गाव निरोगी राहील.

कोरोणामुळे संपूर्ण जगाने आरोग्याला प्रथम प्राधान्य दिले असून, आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी क्षेत्रे यांनी गावपातळीवर राबवलेल्या कचरा संकलन व प्रक्रिया या उपक्रमाचे कौतुक केले. —

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24